
लग्नाला चाललेल्या वऱ्हाडाच्या कारला भीषण अपघात झाल्याने नवरदेवासह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात अन्य पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील संभलमध्ये ही घटना घडली.
बोलेरो गाडीतून नवरदेवासह 14 जण लग्नासाठी चालले होते. मात्र जुनावई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार एका कॉलेजच्या भिंतीवर आदळली. हा अपघात इतका भीषण होता की नवरदेवासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य पाच जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच संभल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अतिवेगामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.