ईडी लावली तर मी सीडी लावणार, त्या सीडीचे काय झाले? एकनाथ खडसेंनी दिली मोठी माहिती

एकनाथ खडसे आपल्या वक्तव्यातून नेहमी राजकीय खळबळ उभी करतात. आताही त्यांनी पत्रकार परिषदे घेत मोठी माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी सीडीबाबत मोठी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही पुन्हा एकदा तोफ जागली आहे.

तुम्ही ईडी लावली तर मी सीडी लावणार, असे एकनाथ खडसे यांनी अनेकदा म्हटले होते. या वक्तव्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मोठी माहिती दिली आहे. प्रफुल लोढा हाचं मला सीडी देणार होता, म्हणून तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावणार होतो, मात्र त्यांनी मला सीडी दिली नाही, म्हणून नाथाभाऊ बदनाम झाले असे खडसे यांनी यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी गिरीश महाजन यांनाही थेट आव्हान दिले आहे. महाजन यांनी माझे चॅलेंज स्वीकारावे, प्रफुल लोढाची नार्कोटेस्ट करावी, महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी खडसे यांनी केली आहे. महाजन यांनी म्हटले होते की विषय संपला. मात्र प्रफुल लोढा जेलमध्ये आहे तोपर्यंत हा विषय संपणार नाही. गिरीश महाजन यांनी माझ्यावर ईडी संदर्भात खोटे गुन्हे दाखल केले. मला अडकवण्याचं काम महाजनांकडून झाले. ईडीसारख्या प्रकरणातून बाहेर आलो. माझ्या जवायाला यांनी अडकून जेलमध्ये टाकले, असा आरोपही यावेळी खडसे यांनी केला आहे.

सध्या सरकारमध्ये अजीत पवार , राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ईडीसारखे असे अनेक आरोप असतानाही ते कसे आता पवित्र झाले? असा सवालही यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला आहे. आता खडसे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.