एकवीरा देवीच्या उत्सवात गोंधळ, पालखी पुढे नेण्यावरून वाद; दोन गटांत तुफान राडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालखी पुढे नेण्यावरून एकवीरा देवीच्या उत्सवात भक्तांनी मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही गटांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली. यात पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या राड्यानंतर संपूर्ण परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या एकवीरा देवीचा पालखी सोहळा 25 मार्च रोजी पार पडला. या सोहळय़ासाठी रायगड, ठाणे, पालघर जिह्यासह राज्याच्या कानाकोपऱयातून हजारो भाविकांनी उपस्थित राहात पालखी सोहळय़ात सहभाग घेतला होता. मात्र रात्री 10 च्या सुमारास पायथा मंदिराच्या आवारात पालखी पुढे नेण्यावरून पनवेल आणि कल्याण येथील दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. दोन्ही गटातील भक्तांनी एकमेकांना मारहाण करत दगडफेक केली. अचानक झालेल्या या राडय़ामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत  5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर लोणावळा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच यामध्ये अनेक वाहनांचे नुकसानही झाले आहे. हा सर्व प्रकार अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये पैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला.