
2025 हे कमाईच्या बाबतीत ‘धुरंधर’ वर्ष ठरले. वर्षभरात 37 सिनेमांची 100 कोटींहून अधिक कमाई मागचे वर्ष हिंदुस्थानातील चित्रपटसृष्टीसाठी कोविडनंतरचे सर्वात यशस्वी वर्ष ठरले आहे. बॉक्स ऑफिस कमाईत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13 टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमध्ये तिकीट दरातील 20 टक्के वाढीचाही मोठा वाटा आहे. हिंदीत या वर्षी कमी चित्रपट आले असले तरी ‘धुरंधर’सारख्या चित्रपटामुळे हिंदी सिनेमाने पॅन इंडिया स्तरावर मोठी झेप घेतली.
- 2024 मध्ये अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा-2ः द रूल’ 1600 कोटींच्या जागतिक कमाईसह देशात अव्वल.
- 2023 मध्ये ‘जवान’ (1150 कोटी), 2020 मध्ये ‘तान्हाजी’ (368 कोटी) आणि 2019 मध्ये ‘वॉर’ (475.5 कोटी) हे त्या-त्या वर्षातील नंबर वन चित्रपट होते.
या चित्रपटाने देशात 950 कोटी आणि जगभरात 1300 कोटींहून अधिक व्यवसाय केला. याव्यतिरिक्त ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘वॉर-2’ सारख्या हिंदी चित्रपटांनीही टॉप-10 मध्ये स्थान मिळवले.
2024 मध्ये 22 चित्रपटांनी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. मल्याळम चित्रपटांचा व्यवसाय 2024 मधील 572 कोटींवरून वाढून 1,165 कोटींवर पोहोचला. तामीळ सिनेमाच्या तिकीट विक्रीत 17 टक्के, तर तेलुगू सिनेमात 15 टक्क्यांनी घट झाली.


























































