
‘पुष्पा 2’ ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ‘पुष्पा 2’ द रुल 100 दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नव्या पोस्टरसह प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
स्टायलिश सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ द राइज चित्रपटाने 2021 मध्ये आपल्या डॅशिंग भूमिकेने चाहत्यांना वेड लावले होते. आता ‘पुष्पा 2’ प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची घोषणा झाल्यापासून चित्रपटाकडे चाहत्यांचे डोळे लागले आहेत. प्रेक्षकांना ‘पुष्पा 2’ रुल चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. ‘पुष्पा 2’ द रुल चित्रपटासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. निर्मात्यांनी नव्या तारखेसह चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
View this post on Instagram
‘पुष्पा 2’ च्या नव्या पोस्टरमध्ये अल्लू अर्जुन ‘पुष्पराज’ च्या भूमिकेत दिसत आहे. यासोबतच चाहत्यांना आणि प्रेक्षकांना एक थरारक सिनेमॅटिक आणि अल्लू अर्जुनच्या हटके अंदाजाचा अनुभव देण्यासाठी टीम सज्ज झाली आहे. सुकुमार दिग्दर्शित आणि फहद फासिल आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिकेतील हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.