
बॉलीवूडचा ही-मॅन धर्मेंद्र यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त मुलगी ईशा देओल हिने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. ईशा देओलने इंस्टाग्रामवर वडील धर्मेंद्र यांच्यासोबत काही फोटो शेअर केले. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘माझे प्रिय बाबा… आपण दोघे प्रत्येक जन्मात, प्रत्येक जगात आणि त्याहूनही पुढे नेहमी सोबत आहोत, बाबा. स्वर्ग असो वा पृथ्वी, आपण एक आहोत. सध्या तरी मी तुम्हाला खूप प्रेमाने, खूप जपून आणि मोठ्या मौल्यवान पद्धतीने माझ्या हृदयात ठेवले आहे — खूप खोलवर — जेणेकरून या संपूर्ण आयुष्यात मी तुम्हाला माझ्यासोबत घेऊन चालू शकेन. तुमच्यासोबत घालवलेल्या त्या जादुई आणि अनमोल आठवणी माझ्यासोबत आहेत. जीवनातील शिकवणी, तुम्ही दिलेले शिक्षण, तुमचे मार्गदर्शन, तुमचे प्रेम, तुमची मर्यादा आणि तुमची ताकद — हे सर्व काही जे तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून दिले आहे, ते कोणीही, कधीही बदलू शकत नाही आणि कोणीही त्याची तुलना करू शकत नाही. वडिलांसोबत घालवलेले प्रत्येक क्षण आज आठवत आहेत. ते नेहमी माझ्याशी मनमोकळे हसत आणि बराच वेळ माझ्याशी गप्पा मारत असत. वडिलांचे प्रेम त्यांच्या सर्व चाहत्यांपर्यंत पोहोचवत राहील,’ असे ईशाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

























































