खारगे चौकशी समितीला मुदतवाढ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीच्या पुण्यातील मुंढवा येथील जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करणाऱ्या अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नेमन्यात आली आहे. या समीतीला अहवाल सादर करण्यासाठी दिलेली एक महिन्याची मुदत 7 डिसेंबरला संपणार होती. ही मुदत आणखी एक महीना वाढविण्यात आली आहे. पुढील आठवडय़ात नागपूर येथे सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या अहवालावरून सरकार अडचणीत येऊ नये म्हणून चौकशी समितीला मुदतवाढ दिल्याची चर्चा आहे.