
रेनो इंडियाने आपली स्वस्त 7 सीटर एमपीव्ही रेनो ट्रायबरचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. या कारची किंमत केवळ 6.29 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या कारमध्ये 21 अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत. या कारला ऑथेंटिक, इवोल्यूशन, टेक्नो आणि इमोशन अशा चार व्हेरियंटमध्ये आणले आहे, तर टेक्नो या मॉडलची किंमत 7.99 लाख रुपये ठेवली आहे. या कारची टक्कर मारुती अर्टिगा, मारुती एक्सएल6 आणि किआ कारन्स या कारशी होईल. या कारली सर्वात आधी 2019 मध्ये लाँच करण्यात आले होते.