घरच्या घरी फेशियल करा, तरुण दिसा

1600

हल्ली ब्युटी पार्लर, स्पा आणि सलूनमध्ये वय कमी दिसावे याकरिता खूपच महागडय़ा अँण्टी एजिंग फेशियल ट्रिटमेंट केल्या जातात, पण हे महागडे फेशियल करणे सगळ्यांनाच शक्य होते, असे नाही. याकरिता वेळ आणि पैसा वाचवून तुमची त्वचा तजेलदार होण्यासाठी तुम्ही घरच्या घरीही फेशियल करू शकता. –

क्लिजिंग करण्यासाठी – एक स्वच्छ टॉवेल, गरम पाण्याचे भांडे

फेशियल मसाजसाठी लागणारे साहित्य – पपई, सफरचंद, बटाटा आणि लिंबाचा रस

फेशियल पॅकचे साहित्य – दीड चमचा मसूर डाळ पावडर, चारोळीची पावडर, मुलतानी माती, लिंबाचा रस, गुलाब पाणी

कृती – सर्वप्रथम कोमट पाण्यात टॉवेल भिजवून घट्ट पिळा. त्या टॉवेलने चेहरा आणि मान संपूर्ण झाका. यामुळे चेहऱयावरील धूळ बाहेर पडून छिद्रे मोकळी होतील. पपई, सफरचंद, बटाटय़ाच्या तुकडय़ांची पेस्ट करून त्यात लिंबाचा रस घालावा. या मिश्रणाने चेहरा आणि मानेला दहा मिनिटे मसाज करावा. त्यानंतर मसूरची डाळ, चारोळी पावडर, मूलतानी माती, यामध्ये फेशियल मसाजसाठी तयार केलेले मिश्रण १ चमचा घालावे त्यात थोडे गुलाब पाणी आणि लिंबाचा रस घालून पॅक तयार करावा. हा पॅक चेहऱयाला लावून ५ मिनिटे मसाज करावा. २५ मिनिटांनी पॅक वाळल्यावर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. या फेशियलमुळे तुमचा चेहरा तजेलदार होऊन चेहऱयावरील सुरकुत्या आणि काळे डाग कमी होण्यास मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या