शूटिंग करताना साऊथच्या स्टंटमॅनने जीव गमावला

दाक्षिणात्य सिनेमात गाडय़ांच्या स्टंटची व्रेझ पाहायला मिळते. अशाच एका सिनेमाच्या शूटिंगवेळी साऊथमधील प्रसिद्ध स्टंटमॅन एस. एम. राजू यांचा शूटिंगदरम्यान एक कार स्टंट करताना मृत्यू झाला. शनिवारी सकाळी ही घटना घडली.  एस. एम. राजू यांनी अभिनेता आर्य आणि दिग्दर्शक पा. रणजीत यांच्या चित्रपटाच्या सेटवर एक अत्यंत धोकादायक कार स्टंट करताना आपला जीव गमावला. या दुर्घटनेमुळे तामीळ चित्रपटसृष्टीतून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.