धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा ताफा आडवला; मी कुठं पैसे घेऊन आलोय का?… असं महाजनांनी म्हणताच शेतकरी आक्रमक, काढता पाय घेतला

मंत्री गिरीष महाजन हे धाराशिवमध्ये नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला. पण मी काय पैसे घेऊन फिरतो का उलट सवाल महाजनांनी शेतकऱ्यांना विचारला आहे. त्यांच्या या विधानाने शेतकऱ्यांमध्ये संतप्त लाट उसळली आहे.

News 18 Lokmat ने याबाबत वृत्त दिले आहे. गिरीष महाजन हे धाराशिवच्या बेलगाव भागात पाहणी करायला आले होते. तेव्हा शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला आणि नुकसाग्रस्त शेतीची पाहणी करा आणि मदत करा अशी विनंती केली. तेव्हा गिरीष महाजन यांनी शेतकऱ्यांना मी काय पैसे घेऊन फिरतो का? अधिकाऱ्यांना मी सांगतो आणि मदत करायला लावतो असे महाजन या शेतकऱ्यांना म्हणाले. महाजनांच्या या विधानामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

शेतकरी म्हणाले की आमची पीकं नष्ट झाली आहेत, जनावर वाहून गेली आहेत. इतकंच नाही तर शेतातली माती वाहून गेली आहे, त्यामुळे पुढच्या वर्षीही शेती करता येणार नाही. शेतकरी ही आपबिती महजनांना सांगत होते, पण त्यांनी असे विधान केल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आहे.