
दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला पत्रकाराला शेजारी बसलेल्या सहप्रवाशाने चुकीचा स्पर्श केला. याबाबत महिलेने सोशल मीडियावर पोस्ट करत घडल्या प्रकाराची माहिती दिली. विमान मुंबई विमानतळावर पोहचताच आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीने ती झोपेत असताना तिला चुकीचा स्पर्श केला. जेव्हा त्याने दुसऱ्यांदा हात पुढे केला तेव्हा ती जागी होती आणि तिने त्याला रंगेहाथ पकडले. जेव्हा तिने आरोपीला रंगेहाथ पकडले तेव्हा त्याने तिला तुम्ही भ्रमित आहात, असे म्हटले.
महिलेची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर, मुंबई पोलिसांनी तात्काळ प्रतिसाद दिला. पोलिसांनी महिला पत्रकाराला तिचा फ्लाइट नंबर, वेळ, सीट नंबर आणि संपर्क माहितीसह अधिक तपशील शेअर करण्याची विनंती केली आणि कारवाईचे आश्वासन दिले.



























































