
‘पीक अवर्स’ला लोकल ट्रेनमध्ये शिरायलाही जागा नसते. सीट मिळण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे सीटवरुन भांडण होण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत. अशा स्थितीत ‘विंडोसीट’साठी दोन महिलांमध्ये झालेल्या राडय़ाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
उल्हासनगर स्थानकाजवळ हा प्रकार घडल्याचे व्हायरल व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. लोकल ट्रेनच्या संपूर्ण सीटवर तीन प्रवासी बसू शकतात, तर चौथ्या प्रवासाला ‘अॅडजस्ट’ करून बसावे लागते. अशाप्रकारे बसू न दिल्याच्या रागातून तरुणी संतापली आणि ती थेट वाद घालणाऱ्या महिलेच्या मांडीवर जाऊन बसली. त्यानंतर जोरदार भांडण होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.

























































