1 एप्रिलपासून आयटीआर फाईल भरणे आणखी सोपे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरणे आता आणखी सोपे होणार आहे. येत्या 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स अॅक्ट लागू होणार आहे. या नव्या नियमामुळे टॅक्स सिस्टमला सोपे, स्पष्ट आणि सर्वसामान्यांना आयटीआर सोप्या भाषेत समजायला हवे, यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. सध्या जो इन्कम टॅक्स लागू आहे तो 1961 मधील आहे.

गेल्या 60 वर्षांत यामध्ये शेकडो संशोधन, अपवाद आणि स्पष्टीकरण जोडले आहे. नोकरदारांना दरवर्षी सीएवर अवलंबून रहावे लागते. एखादी छोटीशी चूकसुद्धा नोटिसीचे कारण बनू शकते. नवीन टॅक्स कायदा हा सिम्पल, शॉर्टर आणि क्लिअर असेल, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.