
जगातील सर्वात आनंदी देश म्हणून पुन्हा एकदा फिनलंडने अव्वल स्थान पटकावले आहे. संयुक्त राष्ट्राने जारी केलेल्या वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2026 मध्ये सर्वात आनंदी देश फिनलंड सलग नवव्यांदा आनंदी देश ठरला आहे. एकूण 147 देशांच्या यादीत हिंदुस्थान देशाला 116 वे स्थान मिळाले असून या यादीत पाकिस्तान 104 व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या यादीनुसार, पाकिस्तान हा हिंदुस्थानपेक्षा आनंदी देश ठरला आहे. 2025 मध्ये हिंदुस्थानचे स्थान 118 होते. यात दोन स्थान कमी होऊन 116 वे स्थान मिळाले आहे. युद्धात अडकलेला इस्रायल देश आनंदी देशात आठव्या स्थानावर आहे. वर्ल्ड हॅपिनेस अहवालानुसार, जास्त सोशल मीडियाच्या वापरामुळे अनेक देशांतील तरुणांच्या आनंद आणि मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होत आहे. वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट 2026 मध्ये अफगाणिस्तान पुन्हा सर्वात कमी आनंदी देश ठरला, त्याच्या वर सिएरा लिओन आणि मलावी आहेत. अमेरिका 23 व्या, पॅनडा 25 व्या आणि ब्रिटन 29 व्या स्थानावर आहे.
टॉप 10 देश
फिनलंड, आइसलँड, डेन्मार्क, कोस्टा रिका, स्वीडन, नॉर्वे, नेदरलँड्स, इस्रायल, लक्झेंबर्ग, स्वित्झर्लंड


























































