अमेरिका आणि इराणमधील युद्ध थांबवण्यासाठी हिंदुस्थानची भूमिका महत्त्वाची; फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांचे मोठे विधान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे संपूर्ण जगावर युद्धाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. “अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम घडवून आणण्यासाठी हिंदुस्थानची महत्त्वाची आणि निर्णायक भूमिका बजावू शकतो,” असे त्यांनी म्हटले आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत ते असे म्हणाले.

राष्ट्राध्यक्ष स्टब म्हणाले की, आज अनेक देश आंतरराष्ट्रीय कायद्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे जागतिक व्यवस्था पुन्हा मजबूत करण्याची गरज आहे, जिथे नियम आणि संस्था योग्यरित्या कार्य करतील.” ते म्हणाले आहेत की, यासाठी सुमारे २०० देशांच्या संमतीची आवश्यकता असेल आणि हिंदुस्थानसारख्या प्रमुख राष्ट्रांची भूमिका निर्णायक ठरू शकते.

दरम्यान, स्टब यांनी ५ ते ७ मार्च दरम्यान दिल्लीत झालेल्या रायसीना संवादातही सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील हिंदुस्थानच्या भूमिकेची प्रशंसा केली होती.