
Oil and Natural Gas Corporation (ONGC) च्या मुंबई हाय क्षेत्रातील SHP प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीमुळे एकूण 10 कर्मचारी किरकोळ जखमी झाले. मात्र, तत्काळ आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्रिय करण्यात आल्याने आग वेळीच नियंत्रणात आणण्यात यश आले आणि मोठा अनर्थ टळला.
ही घटना शुक्रवारी सायंकाळी सुमारे 5:45 वाजण्याच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती मिळताच ONGC च्या आपत्कालीन पथकांनी तातडीने कारवाई सुरू केली. सुरक्षा नियमांचे पालन करत परिस्थिती हाताळण्यात आली आणि आग इतर भागात पसरू न देता ती विझवण्यात आली. कंपनीने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या घटनेची माहिती देताना परिस्थिती लवकरच नियंत्रणात आल्याचे स्पष्ट केले.
या घटनेत जखमी झालेल्या 10 कर्मचाऱ्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. जखमा किरकोळ स्वरूपाच्या असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेनंतर प्लॅटफॉर्मवरील कामकाज काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले असून सध्या ऑपरेशन्स पूर्ववत सुरू असल्याचे ONGC ने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेचा सखोल तपास सुरू असून, तपासानंतरच आगीमागील कारण स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.
A fire incident was reported at ~17:45 PM at #ONGC’s SHP Platform, Mumbai High Asset. The situation was promptly brought under control and the fire extinguished.
10 personnel sustained minor injuries and are under medical care. All are stable.
Operations have been normalised.… pic.twitter.com/kP11TKuke1
— Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC) (@ONGC_) April 3, 2026


























































