निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग

अहमदाबाद येथील निर्माणाधीन साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आज सकाळी 6.30 वाजता भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 13 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर दोन तासांनी आग आटोक्यात आली. बांधकाम सुरू असलेल्या स्टेशनच्या एका भागात शटरिंगमध्ये आग लागल्याचे नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने निवेदनात म्हटले आहे.