
चेन्नईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दक्षिण रेल्वेने शनिवारी चेन्नई ते चेंगलपट्टू दरम्यान आपली पहिली एसी लोकल ट्रेन सुरू केली आहे. या नव्या ट्रेनमुळे चेन्नईत रेल्वे लोकलने प्रवास करणायांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे ट्रेन चेन्नई ते चेंगलपट्टू दरम्यान धावणार आहे. परंतु, ही लोकल रविवारी बंद ठेवली जाणार आहे. 10 किलोमीटरसाठी लोकलचे भाडे कमीत कमी 35 रुपये तर 60 किलोमीटरसाठी जास्तीत जास्त भाडे 105 रुपये असणार आहे. या लोकलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.