
जगभरात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा बोलबाला सुरू आहे. जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार, दुचाकी आणि इलेक्ट्रिक सायकल लाँच करत आहेत. आता लंडनच्या गॅटविक विमानतळावर पहिले इलेक्ट्रिक फ्लाईट यशस्वीरीत्या लँड करण्यात आली आहे. हे उड्डाण विन्सी एअरपोर्टस् नेटवर्प इलेक्ट्रो टूरचा भाग आहे. विमानाचे उड्डाण पर्यावरणासाठी प्रदूषणमुक्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगातील पहिले इलेक्ट्रिक फ्लाइट यशस्वीपणे लँड करण्यात आल्याने जगभरात याची चर्चा सुरू झाली आहे. गॅटविक एअरपोर्टने आपल्या विमानतळासाठी 47 नवीन इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी केली आहे.