सोलापूर जिल्हा बँकेचे पाच शाखाधिकारी निलंबित

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माळशिरस तालुक्यातील पाच शाखांमध्ये अनियमितता आढळल्याने पाच शाखाधिकाऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक कुंदन भोळे यांनी निलंबित केल्याने बँकिग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मध्यवर्ती बँकेच्या माळशिरस तालुक्यातील निमगाव येथील शाखेत कर्जदारांनी तारण म्हणून ठेवलेल्या सोन्यामध्ये काही प्रमाणात नकली सोने असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक चाके प्रशासक भोळे हे रूळावर आणण्याचा प्रयत्न करीत असताना बँकेतील अनियमिततेचा हा प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्व शाखांमधील कारभाराची चौकशी होण्याची शक्यता आहे.