नवी मुंबईतून सप्टेंबरपासून विमान उड्डाण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या विमानतळाच्या विकासाचा पहिला टप्पा सप्टेंबर 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या विमानतळाचे सप्टेंबरपर्यंत उद्घाटन करण्याची योजना आहे, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. नियम 293 अन्वये सत्ताधारी पक्षाच्या वतीने मांडलेल्या ठरावावर उत्तर देताना उद्योग, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत ही माहिती दिली.

‘बेस्ट’ या उपक्रमाला या वर्षी 1 हजार कोटी रुपयांची मदत करण्यात आली असून, आवश्यकतेनुसार आर्थिक मदत महापालिकेच्या वतीने देण्यात येते. महापालिकेने आतापर्यंत बेस्ट उपक्रमाला 11 हजार 405 कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.