टेक्सासमध्ये महापुरामुळे 80 जणांचा मृत्यू

अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ग्वाडालुपे नदीत अचानक आलेल्या महापुरामुळे 3 दिवसांत तब्बल 80 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर 41 जण बेपत्ता आहेत. बचाव पथकांकडून त्यांचे शोधकार्य सुरू आहे. दरम्यान, नदीजवळ मुलींसाठी उन्हाळी शिबीर भरवण्यात आले होते. सर्व मुली आणि प्रशिक्षक पुरात अडकले. येथील 750 मुलींना वाचवण्यात आले.