
वाहनाचे आरसी बुक हरवले तर पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करा. डुप्लिकेट आरसीसाठी परिवहन पोर्टलवर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करा.
जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तुमचा वाहन क्रमांक, इंजिन आणि क्रमांक, पत्ता आणि संपर्क क्रमांक यांसारखे तपशील द्या. पोलिसांकडून एफआयआरची प्रत घ्या.
यासोबतच वाहन विमा पॉलिसीची प्रत, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत, पीयूसी सर्टिफिकेटची प्रत, फॉर्म 26, कर्ज असल्यास बँकेकडून एनओसी ही कागदपत्रे तयार ठेवा.
परिवहनच्या पोर्टलवर जाऊन ‘ऑनलाइन सेवा’ आणि नंतर ‘वाहनसंबंधित सेवा’ निवडा. तुमचे राज्य निवडा आणि वाहन क्रमांक टाका. डुप्लिकेट आरसीसाठी अर्ज करा.
ऑफलाइन प्रक्रियेत फॉर्म 26 भरून आरटीओ कार्यालयात अर्ज सादर करा. डुप्लिकेट आरसी मिळेपर्यंत वाहन चालवताना कागदपत्रांची प्रत सोबत ठेवा.






























































