
1 बऱ्याचदा मोबाईलवर व्हॉट्सअॅपचा ओटीपी येण्यात अडचणी येतात. जर तुमच्या बाबतीत असे होत असेल तर सर्वात आधी काही गोष्टी काळजीपूर्वक लक्षात ठेवाव्यात.
2 व्हॉट्सअॅप ओटीपी मिळवण्यासाठी इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे वाय-फाय किंवा मोबाईल डेटा व्यवस्थित चालू आहे का, ते तपासा.
3 एसएमएसव्यतिरिक्त, तुम्हाला फोन कॉलद्वारे ओटीपी मिळवण्याचा पर्याय दिला जातो. हा पर्याय निवडून तुम्ही कॉलद्वारे कोड मिळवू शकता.
4 काही वेळा ओटीपी तुमच्या मेसेजिंग अॅपच्या स्पॅम फोल्डरमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा स्पॅम फोल्डर तपासा किंवा चुकीचा नंबर टाकला का, ते तपासा.
5 अनेक विनंत्या केल्याने ओटीपीसाठी तात्पुरती समस्या निर्माण येऊ शकते. त्यामुळे काही मिनिटे वाट पाहून ओटीपीसाठी पुन्हा प्रयत्न करा.



























































