
मेंदूला पुरेसा आराम न मिळणे, ताणतणाव, पौष्टिक आहार न घेणे, हर्मोन्सचे असंतुलन इत्यादी कारणांमुळे ब्रेन फॉगची समस्या जाणवते. एकाग्रतेचा अभाव, विसरभोळेपणा, थकवा जाणवणे यासारखी लक्षणे ब्रेन फॉगमध्ये दिसतात.
यासाठी सर्वप्रथम खाण्याच्या सवयी बदला, तिखट आणि मसालेदार खाणे टाळा. पालक, मोहरीची पाने, मेथी यासारख्या पालेभाज्यांध्ये आवश्यक क जीवनसत्त्व, ल्युटीन आणि पह्लेट ही तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.



























































