
तुमचे क्रेडिट कार्ड चोरीला गेले तर… चोरी गेलेल्या कार्डवरून ऑनलाईन शॉपिंग किंवा इतर माध्यमातून आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता असते.
तुमचे कार्ड चोरीला गेले तर सर्वप्रथम कार्ड देणाऱया बँकेला संपर्क साधा. कार्ड देणाऱया पंपन्यांच्या विशेष संपर्क क्रमांकावर तत्काळ कॉल करून कार्ड ब्लॉक करा.
पोलीस ठाण्यात संपर्क करून कार्ड चोरीला गेल्याची तक्रार द्या. हा एक महत्त्वाचा पुरावा तुमच्याकडे राहतो. चोरीला गेलेल्या कार्डवर झालेले संशयास्पद व्यवहार बँकेला कळवा.
क्रेडिट रिपोर्ट तयार करणाऱया सिबील यासारख्या संस्थांना माहिती देऊन फ्रॉड अलर्ट सक्रिय करण्याची सूचना द्या. यामुळे तुमचा क्रेडिट रिपोर्ट खराब होणार नाही.
रिकरिंग पेमेंट तपासा. ते बंद करा. नवे क्रेडिट कार्ड पाठवण्याची पंपनीकडे विनंती नोंदवा. नवे कार्ड आल्यानंतर त्यावर इतर सुविधा सक्रिय करता येतील.


























































