असं झालं तर… फोनची बॅटरी लवकर संपत असेल तर…

आजकाल सोशल मीडिया व इतरऍप्समुळे स्मार्टफोनची बॅटरी लवकर संपते. स्मार्टफोनमधील काही गोष्टीदेखील बॅटरी लवकर संपण्यासाठी कारणीभूत ठरतात.

एकदा चार्ज केलेली बॅटरी दिवसभर पुरवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमधील वायफाय आणि ब्लुटूथ स्कॅनिंग बंद करा.

तुम्ही फोन वापरत नसाल, त्या वेळी डीप स्लीप मोड सुरू करा. त्यामुळे अनावश्यक ऍप्स आणि बॅकग्राऊंड प्रक्रिया थांबतात. त्यामुळे प्रोसेसर आणि बॅटरीवरील लोड कमी होतो.

तुमच्या फोनचा डिस्प्ले हा बरीच बॅटरी वापरतो. डिस्प्लेचा ब्राईटनेस हा ऑटो मोडवर ठेवा. त्यामुळे ब्राईटनेस गरजेनुसार सभोवतालच्या प्रकाशानुसार कमी किंवा जास्त होतो.

याशिवाय फोनचा इअरफोन किंवा स्पीकरचा आवाज गरजेनुसार सेट करा. आवाज पूर्णपणे वाढवून ठेवला तर स्पीकरसाठी जास्त बॅटरी वापरली जाते.