एस. एम. कृष्णा यांचे निधन

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री, देशाचे माजी परराष्ट्र मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम. कृष्णा यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा यांचे मंगळवारी पहाटे बंगळुरूतील त्यांच्या राहत्या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. कृष्णा हे 1999 ते 2004 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले. 2004 ते 2008 या काळात ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तर 2009 साली मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम पाहिले. दरम्यान, 2017 मध्ये कृष्णा यांनी काँग्रेसचा हात सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. जानेवारी 2023 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली.