
जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. दिल्लीतील आरएमएल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत त्यांनी केलेल्या मोठ्या दाव्यामुळे ते चर्चेत आले होते.
ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना 11 मे रोजी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले.