माजी राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीला 20 महिन्यांची शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण कोरियातील माजी राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांच्या पत्नी किम कियोन यांना दक्षिण कोरियाच्या सियोल सेंट्रल डिस्ट्रिक्ट कोर्टाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 20 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. किम कियोन यांना युनिफिकेशन चर्चकडून लाच घेतल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. किम कियोन यांना डिसेंबर 2024 मध्ये मार्शल लॉ लागू करण्याच्या प्रयत्नानंतर पदावरून हटवण्यात आले होते. किम कियोन यांना 15 वर्षांची कठोर शिक्षा आणि मोठा दंड मागितला होता, परंतु न्यायालयाने त्यांना 20 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.