फॉक्सकॉनकडून 30 हजार उमेदवारांची भरती

आयफोन निर्मिती करणारी कंत्राटदार कंपनी फॉक्सकॉनने अलीकडेच आपल्या कारखान्यामध्ये 30 हजार नव्या उमेदवारांना कामावर घेतले आहे. विशेष म्हणजे 80 टक्के उमेदवार या महिला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. बंगळुरूजवळच्या देवनहळ्ळी येथे असलेल्या आपल्या आयफोन निर्मितीच्या कारखान्यामध्ये नव्याने कर्मचाऱयांना सामावून घेतले आहे. ही भरती गेल्या नऊ महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्याने यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे. 300 एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रफळातील अॅपलची कंत्राटदार कंपनी फॉक्सकॉनची स्थापना करण्यात आली आहे. आयफोन 16 ची निर्मिती करण्यासोबत आयफोन 17 प्रो मॅक्स याची निर्मिती या कारखान्यामध्ये केली जात आहे.