
मित्राच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे दुखावलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेल्या चिठ्ठीवरून पोलिसांनी तिच्या मित्राला अटक केली आहे.
स्तुती असे त्या तरुणीचे नाव होते. 8 मार्च रोजी ती आपल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेली. सकाळी दरवाजा उघडत नसल्याने तिच्या वडिलांनी धक्का देऊन दरवाजा खोलला असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली. अॅण्टॉपहिल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता त्यांना सहा पानांची सुसाईड नोट सापडली. त्यात तिने फैजुल खान (31) या मित्राचा उल्लेख केला आहे. त्याने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे स्तुती प्रचंड दुखावली होती. त्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याने पोलिसांनी फैजुलला अटक केली. फैजुल आणि स्तुतीची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली होती.





























































