असं झालं तर… अर्ध्यावर शिक्षण सुटले तर…

काही मुलांना गरीबीमुळे शिक्षण अर्ध्यावर सोडून द्यावे लागते. तर काही मुलींचे लग्नानंतर शिक्षण अर्ध्यावर राहते. जर असे झाले असेल तर काय कराल?

तुम्हाला शिक्षण घेण्याची जिद्द असेल तर बऱयाच गोष्टी शक्य होतात. मुक्त विद्यापीठातून सोयीनुसार आणि वेळेनुसार शिक्षण पूर्ण करू शकता.

काही मान्यताप्राप्त विद्यापीठात ऑनलाइन पदवी मिळवण्याची संधी मिळते. तुम्हाला ज्या विषयात आवड असेल त्या विषयात तुम्ही पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकता.

जर तुमचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले असेल आणि तुम्ही पदविकेपर्यंत शिक्षण घ्यायचे असेल तर प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमसुद्धा उपलब्ध आहेत.

तुमची इच्छाशक्ती आणि जिद्द हे सर्वात महत्त्वाचे आहे. कोणत्याही वयात शिक्षण पूर्ण करता येते. तुमच्यासाठी सोयीस्कर असलेला पर्याय निवडू शकता.