नवीन आधार अ‍ॅपचे फुल व्हर्जन लाँच, आधार अपडेटसाठी आता केंद्रात जाण्याची गरज नाही

आधारकार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याचा एक भाग बनले आहे. बँक खाते उघडणे, नवीन सीमकार्ड मिळवणे, सरकारी योजनांचा लाभ घेणे, टॅक्स भरणे ही सर्व कामे आधारविना अशक्य झाली आहेत. आता यूआयडीएआयने न्यू आधार अ‍ॅपचे फुल व्हर्जन लाँच केले आहे. या नव्या व्हर्जनमुळे घरी बसून अनेक कामे होतील. आता आधार शेअर करण्याची गरज नाही. आता केवळ नाव किंवा फोटो शेअर करू शकता. यामुळे धोका कमी होईल. तसेच प्रायव्हसी सुरक्षित राहील. बायोमेट्रिक लॉक म्हणजेच फिंगरप्रिंट लॉक अनलॉक करू शकता. यामुळे अनधिकृत वापर कमी होईल. सुरक्षा आणखी मजबूत होईल.

एकाच फोनमध्ये कुटुंबातील 5 सदस्यांपर्यंत आधार प्रोफाइल मॅनेज करू शकता. ऑफलाइन व्हेरिफिकेशन अपडेट मिळणार असल्याने फेस ऑथेंटिफिकेशनने घरी बसून नोंदणीकृत मोबाइल नंबर बदलू शकता. हे करण्यासाठी आता आधार केंद्रात जाण्याची गरज लागणार नाही. न्यू आधार अ‍ॅपला गुगल प्ले स्टोअर (अँड्रॉइड) आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर (आयओएस) वरून सहज डाऊनलोड करू शकता. यूआयडीएआयने याला सुरक्षित आणि युजर फ्रेंडली बनवले आहे.