गगनजीत भुल्लर आयजीपीएल स्पर्धेचा विजेता

आशियाई टूरवर 11 जेतेपद पटकावत हिंदुस्थानचा सर्वात यशस्वी गोल्फपटू ठरलेल्या गगनजीत भुल्लरने दोन अंडर 70 चे कार्ड खेळत ‘आयजीपीएल इन्व्हिटेशनल टूर्नामेंट’च्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले आहे.  आयजीपीएलच्या या आयका@न खेळाडूने 70-71-70 च्या शानदार फेऱ्यांसह एपूण पाच अंडर कार्ड केले आणि एम. धर्माचा दोन शॉट्सने पराभव केला. भुल्लरला 22.5 लाख रुपयांचा पुरस्कार लाभला. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या धर्माने 15 लाख रुपये जिंकले. संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या वीर गणपती, कार्तिक शर्मा आणि शौर्य बिनू यांना प्रत्येकी 8.7 लाख रुपये मिळाले. धर्माने 70-75-68 गुण मिळवले. नवोदित गणपती (72-72-70), कार्तिक शर्मा (73-73-68) आणि बिनू (69-72-73) हे संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर होते.