Photo – गणराया, पर्यावरणाचा समतोल राखून विकास करण्याचं शहाणपण माणसाला दे!

गणेशोत्सवानिमित्त अनेकांनी पारंपरिक देखाव्यांसह जनजागृती करणारे देखावेही साकारले आहेत.

डोंबिवलीतील प्रथमेश केळकर याने पर्यावरणाचा समतोल राखत विकास करण्याचे शहाणपण माणसाला येऊ दे, असे साकडे गणरायाला घातले आहे.

त्याने गणरायासाठी विशेष आरास केली आहे. हैदराबाद येथील गच्ची बोली जंगलतोड हा विषय घेतला आहे.

हैदराबाद जवळील काचा गच्ची बावली अर्थात गच्ची बोली जंगलात मध्यरात्री जंगलतोड झाली.

400 एकर जमिनीवरील 40 हजारांहून झाडं तोडण्यात आली होती. अनेक प्राणी, पक्षी यांची घरं उद्ध्वस्त झाली.

पर्यावरणचा समतोल राखूनच विकास करण्यात आला पाहिजे असे म्हणत गणपती बाप्पाचे वाहन मुशक सेना पुन्हा नव्याने कामाला लागून जंगल संवर्धन करताना दिसत आहे.

मूर्तिकार आकाश लिहे यांनी केळकर यांच्यासाठी खास शाडू मातीची मूर्ती साकारली आहे. मूर्ती आणि देखावा लक्षवेधक ठरले आहे.