अवघ्या दोन वर्षांत नोकरी सोडण्याचा Gen Z चा कल, जॉब सॅटिस्फेक्शनला जास्त महत्त्व

जेन झीचा कल हा दोन वर्षांत नोकरी सोडण्याकडे आहे. इतकंच नाही तर या पिढीला सॅलरी सॅटिसफेक्शनपेक्षा जॉब सॅटिसफेक्शन महत्त्वाचं वाटतं. Gen Z at Workplace या अहवालात ही निरीक्षणं नोंदवण्यात आली आहे.

Gen Z at Workplace हा अहवाल तयार करण्यासाठी पाच हजारहून अधिक जेन झी कर्मचारी आणि 500 पेक्षा जास्त एच आर तरुणांशी चर्चा केली गेली. यात असे आढळून आले की, 47 टक्के जेन झी हे दोन वर्षात दुसरी नोकरी शोधतात. त्यांच्यासाठी योग्य पगार मिळाला नाही तरी चालेल पण काम मनासारखं असलं पाहिजे. तर दुसरीकडे 51 टक्के तरुणांना नोकरी गमावण्याची भिती आहे. एकदा नोकरी मिळाल्यानंतर त्यात आपली कौशल्य सुधरवणं आणि आहे ती नोकरी टिकवण्याचं त्यांच्यापुढे आव्हान असतं. या सर्व्हेमधील 77 टक्के तरुणांनी कमर्शियल फील्ड आणि ब्रॅण्डला महत्त्व दिले आहे. दर 43 टक्के तरुणांनी अनुभव आणि नोकरीच्या ठिकाणी प्रगतीला महत्त्व दिले आहे. एकूण सर्व्हेपैकी 72 टक्के तरुणांनी सॅलरी सॅटिस्फेक्शन ऐवजी जॉब सॅटिस्फेक्शनला महत्त्व दिले आहे.

Gen Z म्हणजे कोण
1997 ते 2012 दरम्यान जन्माला आलेल्या पिढीला जेन झी म्हणतात. तर 1981 ते 1196 दरम्यान जन्माला आलेल्या पिढीला मिलेनियल्स म्हणात. तर 2012 पासून पुढे जन्माला आलेल्या पिढीला अल्फा जनरेशन म्हणतात.