
घाटकोपर व अंधेरी परिसरात ड्रग्जची तस्करी करणाऱया तिघांना अमली पदार्थविरोधी पथकाने पकडले. त्या तिघांकडून पोलिसांनी एक किलो 28 ग्रॅम वजनाचा दोन कोटी तीन हजार किमतीचा एमडी साठा जप्त केला आहे. अमली पदार्थविरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने 31 मे रोजी घाटकोपर पूर्वेकडील बस स्टॉपजवळ ड्रग्ज विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा तस्करांना पकडले होते. त्यावेळी एकाकडून 257 ग्रॅम आणि दुसऱयाकडून 156 ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला होता. त्यानंतर वरिष्ठांंच्या मार्गदर्शनाखाली अटक आरोपींची चौकशी सुरू असताना अंधेरी येथील तिसऱया ड्रग्जमाफियाचे नाव समोर आले. त्यानुसार तिसऱयालादेखील पकडून त्यांच्याकडून 506 ग्रॅम एमडी जप्त केला. अशा प्रकारे घाटकोपर युनिटने तिघा ड्रग्जतस्करांना पकडून दोन कोटी तीन हजार रुपये किमतीचा एमडी साठा जप्त केला.