
उदयोन्मुख स्टार खेळाडू वैभव सूर्यवंशीचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. वैभव हा एक प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र, खेळाडूंना परिपक्व होण्यासाठी वेळ द्यावा लागतो. त्यामुळे वैभवलासुद्धा थोडा वेळ देण्याची गरज आहे. वैभवमध्ये असाधारण क्षमता आहे, असे मत हिंदुस्थानचे जगज्जेते कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.
वैभवने जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंत शतक झळकवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. हे हिंदुस्थानी फलंदाजाचे सर्वात वेगवान आयपीएल शतक ठरले. वैभवच्या या खेळीचे सर्वत्र काwतुक होत आहे. मात्र, काल झालेल्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात वैभव शून्यावर बाद झाला.
वैभवच्या खेळीबाबत कपिल देव म्हणाले, त्याने घाईघाईने निर्णय घेण्यापासून दूर राहण्याची गरज आहे. त्याला वेळ द्या, घाई करू नका. तो प्रतिभावंत खेळाडू आहे. मात्र, खेळाडूंना परिपक्व होण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे परिपक्व होण्यासाठी वैभवलादेखील पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे
स्कोअरबोर्ड
चौकार – 1555
षटकार – 852
अर्धशतक – 102
शतक – 4
विकेट – 614
3 विकेट – 47
धाव – 18045
सर्वाधिक धावा – साई सुदर्शन – 504
सर्वाधिक विकेट – प्रसिध कृष्णा – 19
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. गुण नेररे
मुंबई 11 7 4 14 1.274
गुजरात 10 7 3 14 0.867
बंगळुरू 10 7 3 14 0.521
पंजाब 10 6 3 11 0.199
दिल्ली 10 6 4 12 0.362
लखनौ 10 5 5 10 – 0.325
कोलकाता 10 4 5 9 0.271
राजस्थान 11 3 8 6 – 0.780
हैदराबाद 10 3 7 6 – 1.192
चेन्नई 10 2 8 4 – 1.302
(ही आकडेवारी गुजरात – हैदराबाद सामन्यापर्यंतची आहे.)
आजची लढत – बंगळुरू वि. चेन्नई सायं. 7.30 (बंगळुरू)