‘गोकुळ’चे दूध 1 रुपयाने महागले

जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) येत्या 1 सप्टेंबरपासून म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या दरवाढीमुळे गोकुळच्या म्हैस व गाय दूध उत्पादकांना महिन्याकाठी सुमारे साडेचार ते पाच कोटींचा जादाचा दर मिळणार आहे. सद्यःस्थितीत गोकुळ दुधाच्या विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

याशिवाय संस्था इमारत अनुदान, दूध संस्था कर्मचारी प्रोत्साहन वाढ, मुक्त गोठा योजनेत सुधारणा आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी सांगितले.

दूध उत्पादकांना आर्थिक दिलासा देण्याच्या हेतूने म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये प्रतिलिटर एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून जिह्यातील म्हैस दूध खरेदी दरामध्ये 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ.साठी प्रतिलिटर रुपये 50.50 वरून रुपये 51.50 करण्यात आला आहे. तसेच 6.5 फॅट व 9.0 एस.एन.एफ.साठी प्रतिलिटर रुपये 54.80 वरून रुपये 55.80 करण्यात आला आहे. गाय दुधामध्ये 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ.साठी प्रतिलिटर गाय दूध खरेदी दर 32.00 रुपयेवरून 33.00 रुपये करण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.