सोने लकाकले; 357 रुपयांनी महागले

सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 375 रुपयांनी वाढून 97,828 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी झाली आहे. तर चांदीचे दर 1 हजार 300 रुपयांनी वाढून 1,12,300 रुपयांवर पोहोचले आहेत. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोने आणि चांदीचे दर वाढले आहेत. यापूर्वी सोन्याची किंमत 97 हजार 453 रुपये होती. तर चांदीची किंमत 1,11,000 रुपये इतकी होती. 14 जुलै रोजी चांदीने 1,13,867 रुपयांचा सर्वोच्च दर गाठला होता. तर 8 जून रोजी सोन्याने 91,454 रुपयांवर गेला होता.

यंदा 1 जानेवारीपासून आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किंमतीत 21,666 रुपयांची वाढ झाली. ही वाढ 76 हजार 162 वरून थेट 97,828 वर गेली. त्याचवेळी चांदीची किंमतही 26,292 रुपयांनी वाढून 86,017 रुपये प्रति किलोवरून 1,12,300 रुपये इतकी झाली. गेल्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये सोने 12,810 रुपयांनी महाग झाले.

सोने कुठे, किती?

मुंबई – 24 कॅरेट सोन्याचे दर 99,380 आहे आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 91,100 आहे.
दिल्ली – 99,520 रुपये आणि 91,250 रुपये
कोलकाता – 99,380 आणि 91,100 रुपये
चेन्नई – 99,380 आणि 91,100 रुपये