
भगवान जगन्नाथ आणि बलभद्र तसेच देवी सुभद्रा यांचा रथ तब्बल 208 किलोहून अधिक सोन्याच्या आभूषणांनी सजवण्यात आला. भाविकांना सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत या रथाचे दर्शन घेता आले. मंदिर प्रशासनाने या त्रिदेवांचे दर्शन घेण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध सुविधा उपलब्ध करून दिली. तसेच देवांना जवळपास 30 प्रकारच्या विविध डिझाईनचे दागिने परिधान करण्यात आले. यात सोने, हिरे, चांदी आणि इतर धातूंचा समावेश होता. दरम्यान, भाविकांची गर्दी वाढत चालल्यामुळे चेंगराचेंगरीची किंवा इतर कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा, पोलीस प्रशासन आणि स्वयंसेवक सतर्क होते.