सोने सवा लाखावर तर चांदी दीड लाखाच्या घरात

सोने आणि चांदीच्या किंमतीने बुधवारी पुन्हा एकदा उच्चांक गाठला. सोन्याच्या किंमती प्रति तोळा 1 लाख 21 हजार रुपयांवर पोहोचल्या तर चांदीच्या किंमतीने प्रति किलो दीड लाखांचा टप्पा गाठला. बुधवारी 24 पॅरेट सोन्याच्या किंमतीत 1 हजार 858 रुपयांची वाढ झाली असून 10 ग्रॅम सोन्यासाठी 1,21,799 रुपये मोजावे लागले. तर चांदीचा भाव 2 हजार 342 रुपयांनी वाढून 1 लाख 50 हजार 783 रुपये प्रति किलो पोहोचला. 2025 पासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत जवळपास 45 हजार रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 पॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 76 हजार रुपये होती. ती सवा लाखापर्यंत पोहोचली आहे. या काळात सोन्यापाठोपाठ चांदीच्या किंमतीत 65 हजारांपर्यंत वाढ झाली आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी चांदी प्रति किलो 86 हजार रुपये होती.