
या वर्षात सोन्याच्या दरात मोठे चढउतार झाले आहेत. या वर्षातच सोन्याने 1,01,178 रुपये प्रति 10 ग्रॅम हा उच्चांक गाठला होता. त्यानंतर त्याच्या दरात घट झाली आहे. गेल्या आठवड्यातही सोन्याच्या दरात 5 हजारांची घट झाली होती. त्यावेळी सोने खरेदीसाठी सुवर्णसंधी आहे, असे मत तज्ज्ञांनी वर्तवले होते. आता या आठवड्यात सोन्याच्या दरात 1500 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ झाली असली तरी तो त्याच्या उच्च्याकांपेक्षा स्वस्त असल्याने तज्जांनी सोने खरेदीची इच्छ असणाऱ्यांना आताच सोने खरेदी करण्याचा सलला दिला आहे. आगामी काळात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
सोन्याच्या किमतीत चढ-उतार सुरूच आहेत. गेल्या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाले होते, तर या आठवड्यात त्याच्या किमतीत वाढ झाली आहे. या आठवड्यात सोने 1500 रुपयांनी महागले आहे. 27 जून रोजी वायदे बाजारात (एमसीएक्स) 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 95,450 रुपये होती. ती या आठवड्यात 4 जुलै रोजी 96,988 रुपयांवर पोहोचली. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमती वाढल्या असल्या तरी अजूनही सोने त्याच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे.
वायदे बाजारात सोन्याचा उच्चांक 1,01,078 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे आणि सध्या तो 4090 रुपयांनी स्वस्त आहे. केवळ मल्टी कमोडिटी एक्सचेंजच नाही तर देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 27 जून रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅम 96,135 रुपये होता. तो या शुक्रवारी वाढून 97,142 रुपयांवर पोहोचला. देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति 10 ग्रॅम 1007 रुपयांची वाढ झाली आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम 96,753रुपये) आणि 20 कॅरेट सोन्याची किंमत (प्रति 10 ग्रॅम 88,982रुपये) वर पोहोचली.