
गेल्या पाच दिवसांपासून सततच्या घसरणीनंतर आता सोने आणि चांदीच्या किमतीत एका दिवसात मोठी वाढ झाली. वायदे बाजार मंगळवारी सुरू होताच चांदीचे भाव 21,000 रुपयांपेक्षा जास्त वाढले तर सोन्याच्या किमती 5,000 रुपयांनी वाढल्या. आज सोने प्रतितोळा 153930 रुपये तर चांदी प्रतिकिलो 2,80,000 रुपये झाले.
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण होत होती. परंतु मंगळवारी घसरणीला ब्रेक लागले. एमसीएक्सवर फ्युचर्स ट्रेडिंग सुरू होताच सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली. सोमवारी चांदी प्रतिकिलो 2,25,000पर्यंत घसरली होती; परंतु मंगळवारीच्या व्यवहारादरम्यान ती मागील बंदच्या तुलनेत 2,57,000वर पोहोचली. त्यानंतर त्यात आणखी वाढ झाली. सोने आता पुन्हा दीड लाखांवर पोचले आहे. सोमवारी सोने 1.33 लाखावर घसरले होते. त्यात आज 17 हजारांची वाढ झाली. मंगळवारी सोन्याच्या किमती 5500 रुपयांनी वाढल्या.
3 फेब्रुवारी रोजी देशात 10 ग्रॅम 24 पॅरेट सोन्याचा दर 149,420 रुपये तर 22 पॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 136,968 रुपये झाला. 1 किलो चांदीचा दर 2,54,020 रुपये राहिला. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि घडणावळ यामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती देशभर बदलतात.



























































