
इराण–इस्रायल युद्धामुळे सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी चांदी थेट 13 हजार रुपयांनी वाढून 2 लाख 76 हजार 553 रुपये प्रति किलो वर पोहोचली आहे, तर सोन्याच्या किमतीत 1700 रुपयांची वाढ झाल्याने सोने प्रति तोळा 1 लाख 62 हजारांवर पोहोचले आहे. या वर्षी सोने 27 हजार रुपयांनी, तर चांदी 42 हजार रुपयांनी महाग झाली आहे. गेल्या वर्षीच्या अखेरीस सोने प्रति तोळा 1 लाख 33 हजार रुपये होते, तर चांदीत 42 हजारांची वाढ झाली आहे. जर इराण आणि अमेरिकेमधील तणाव आणखी वाढला किंवा कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा वाढल्या, तर सोने-चांदीच्या किमती पुन्हा वाढतील.


























































