
हिंदुस्थानी नौदलात दहावी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. नौदलाने नागरी प्रवेश परीक्षा (आयएनसीईटी 01/2025) अंतर्गत नागरी भरती 2025 मोहिमेसाठी अधिकृतपणे अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये विविध गट ‘क’ पदांसाठी 1,100 हून अधिक रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2025 रोजी अधिकृत भरती पोर्टल incet.cbt-exam.in द्वारे सुरू झाली आहे. या भरतीमध्ये मॅट्रिक आणि आयटीआय ते डिप्लोमा व पदवीपर्यंतच्या पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध आहेत.
पदांमध्ये ट्रेड्समन मेट, चार्जमन, सिनियर ड्राफ्ट्समन आणि इतर अनेक पदांचा समावेश आहे. नौदलाच्या रिक्त जागांमध्ये अभियांत्रिकी, लॉजिस्टिक्स, प्रशासन आणि आरोग्य सेवा यासह अनेक पदे आहेत. या पदांसाठी अनुभवी व्यावसायिक आणि फ्रेशर्स दोघांनाही वयोमर्यादेची अट आहे. पदानुसार ही वयोमर्यादा 18 ते 45 वर्षे आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जुलै 2025 आहे.
- दहावी किंवा बारावी उत्तीर्ण ते अभियांत्रिकी किंवा इतर विषयांमध्ये डिप्लोमा किंवा पदवीपर्यंत शिक्षण अर्ज फक्त ऑनलाइन सादर करावे लागतील.
- निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धतीनिवड प्रक्रियेत संगणकआधारित चाचणी (सीबीटी) समाविष्ट असते. त्यानंतर पदाच्या स्वरूपानुसार कौशल्य चाचणी घेतली जाते. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी केली जाईल.