
कर्नाटकातील सिद्धरमय्या सरकारने चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणाऱ्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कर्नाटकात मल्टिप्लेक्ससह सर्व चित्रपटगृहांत आता कोणत्याही चित्रपटाच्या तिकिटाची जास्तीत जास्त किंमत ही 200 रुपये असणार आहे. यामध्ये मनोरंजन टॅक्सचाही समावेश आहे. या निर्णयामुळे चित्रपटप्रेमींना दिलासा मिळाला आहे.