
गुगलने जी-मेल यूजर्ससाठी एक मोठी घोषणा केली असून जी-मेल यूजर्सला आता व्हॉट्सअॅपमध्ये मिळणारे एंड टू एंड एनस्क्रीन फिचर मिळणार आहे. अँड्रॉइड आणि आयओएस ऑपरेटिंगवर ही ऑपरेटिंग सिस्टम लागू होणार आहे. एंड टू एंड एन्क्रिप्शन हे पूर्णपणे डिजिटल सिक्योरिटी लॉक सिस्टम आहे. या टेक्नोलॉजीमुळे डेटा पाठवणारा आणि रिसिव्ह करणाऱयाव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती मेसेजला वाचू शकणार नाही. अपडेट मिळाल्यानंतर यूजर्सला जी-मेल मोबाईल अॅपच्या मदतीने एन्क्रिप्टेड ई-मेल लिहिता येतील, पाठवता येतील आणि वाचता येतील. याआधी एन्क्रीप्टेड ई-मेलसाठी डेस्कटॉप किंवा थर्ड पार्टी टूल्सची मदत घ्यावी लागत होती. हे अपडेट रॅपिड रिलीज आणि शेडय़ुल रिलीज दोन्ही डोमेनसाठी लाइव्ह करण्यात आल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.

























































